Koynanagar च्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज 50 वर्षे पूर्ण | Lokmat News

2021-09-13 3

11 डिसेंबर 1967. कोयनानगरवर उष:काल होता होता काळरात्र आली. गावकरी साखरझोपेत असताना पहाटे 4वाजून 21 मिनिटांनी या भागात महा प्रलयंकारी भूकंप झाला. ज्याची तीव्रता 6.7 रिश्टर स्केल इतकी होती. धाब्याची घरं पत्त्यासारखी कोसळली आणि साखर झोपेतच अबाल वृद्ध त्याखाली गाडली गेली. डोळे उघडण्याचीही कुणाला संधी मिळाली नाही. 190 जणांचा बळी गेला.हजारो लोक कायमचे जायबंदी झाले. लाखो बेघर झाले. सूर्योदयानंतर डोळ्यासमोर उभा होता आपल्याच माणसांच्या मृतदेहांचा ढिग आणि उध्वस्थ झालेला संसार.जीवाच्या आकांतानं ढिगारे उपसत गावकरी आपल्या नातलगांना शोधत होते.. या भूकंप ग्रस्थांच्या आठवणी ऐकताना आजही अंगावर शहारे येतात.
भूकंपाच्या या घटनेला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires